संपत्ती म्हणजे काय? ह्याचा हेतू काय?
अनेक लोक या प्रश्नांची उत्तरे "स्वतःच्या स्वप्नांचे आयुष्य जगणे", किंवा "पैशाची चिंता नसणे” किंवा "आर्थिक स्वातंत्र्य असणे” असे देतात. श्रीमंत असणे याचा अर्थ होतो स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा असणे.
तरीही, सर्व दीर्घकालीन खर्चांसाठी एक घटक विसरून चालत नाही, आणि तो म्हणजे - "चलनवाढ". नावाप्रमाणेच, चलनवाढीमुळे आपल्याला आपल्या भावी उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आज जी किंमत मोजावी लागणार असेल, त्यापेक्षा अधिक किंमत त्या उद्दिष्टाची पूर्तता करण्याची वेळ येईल तेव्हा मोजावी लागेल.
डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड्समुळे आपल्याला वाजवी जोखीम पत्करून दीर्घकालामध्ये संपत्ती निर्मिती करण्याची संधी मिळते. इक्विटी-संबंधी जोखमीचे नियंत्रण इक्विटी म्युच्युअल फंड द्वारे तीन कारणांमुळे केले जाते.
- त्या फंडचे व्यवस्थापन करणाऱ्या प्रोफेशनल फंड व्यवस्थापकाचे कौशल्य
- अनेक सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केल्यामुळे झालेले जोखमीचे विभाजन
- दीर्घकालासाठी गुंतवणूक केल्यामुळे अल्पकालीन चढ-उतारांचा प्रभाव कमी होणे
हे जरी खरे असले की मालमत्तेचा प्रकार असलेल्या इक्विटीमुळे गुंतवणूकदारांना संपत्ती निर्मितीची संधी मिळते, तरीही हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे ठरेल की कमी कालावधीसाठी इक्विटी हा मालमत्तेचा प्रकार फार अस्थिर असतो. म्हणूनच, आपण दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे.