गुंतवणुकीच्या क्षेत्रात मध्ये फ्लेक्सिबिलिटीला फार महत्व आहे, बऱ्याचदा गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे काढून घेण्याची गरज भासते. वैयक्तिक आर्थिक निकड असताना किंवा एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी गुंतवणूक केलेली असते, जसे की निवृत्ती, टॅक्स क्रेडिट इत्यादि त्याची पूर्तता झाल्यावर गुंतवणूकदार म्युच्युअल फंड्स विकण्याचा निर्णय घेऊ शकतो.
म्युच्युअल फंड्स रिडीम करण्याच्या पद्धती
म्युच्युअल फंड्स ऑन लाइन आणि ऑफलाइन पद्धतीने रिडीम करता येतात, हे एएमसी आणि गुंतवणूकदाराच्या पसंतीवर अवलंबून असते ज्यामध्ये विशिष्ट पायर्या आवश्यक असतात:
ऑफलाइन रिडम्शन: एएमसी/आरटीए/एजंट/वितरक
ऑफलाइन रिडम्शन करण्यासाठी रिडम्शनसाठी असलेला अर्ज भरून त्यावर सही करून तो एएमसीच्या किंवा रजिस्ट्रारच्या विशिष्ट ऑफिसमध्ये द्यावा लागतो. एखादा गुंतवणूकदार एजंट किंवा वितरकामार्फत त्यांचे म्युच्युअल फंड रिडीम करण्यासाठीचा रीतसर स्वाक्षरी केलेला अर्ज देण्याचा पर्याय निवडू शकतो, जो अर्ज नंतर एएमसी किंवा आरटीए कार्यालयात देण्यात येतो. या अर्जात, धारकाचे नाव, फोलिओ नंबर, रीडीम करायची युनिट्सची संख्या किंवा रक्कम इत्यादि माहिती भरायची असते आणि त्यावर सही करायची असते. ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर तुमचे पैसे तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा होतात, जर आयएफएससी कोड दिलेला नसेल तर अकाऊंट पेयी चेक द्वारे जमा केले जातात
ऑनलाइन रिडम्शन: एएमसी /आरटीए/एजंट/वितरक/एमएफ सेंट्रल च्या वेबसाइट्स आणि/ट्रेडिंग/डीमॅट खाते
तुमच्या म्युच्युअल फंड्सचे ऑनलाइन रिडम्शन करण्यासाठी तुम्ही संबधित म्युच्युअल फंड / रजिस्ट्रार / एमएफडी / ॲग्रीगेटर वेबसाइट किंवा एमएफ सेंट्रलच्या वेबसाइटवर जाऊ शकता. फोलिओ नंबर किंवा पॅनकार्ड नंबर किंवा त्या वेबसाइटची विशिष्ट लॉगिन माहिती वापरुन लॉगिन करा. ज्या योजनेतून यूनिटस रिडीम करायचे आहेत ती योजना निवडून किती यूनिटस रिडीम करायचे त्याची संख्या किंवा रिडम्शनची रक्कम तिथे भरा.
डीमॅटद्वारे रिडम्शन: जर तुम्ही म्युच्युअल फंड्सची खरेदी डीमॅट किंवा ट्रेडिंग अकाउंटद्वारे केली असेल तर रिडम्शन प्रक्रिया त्याच खात्याचा वापर करून करावी लागेल. पूर्तता झाल्यानंतर, रिडम्शन विनंतीवर प्रक्रिया होऊन इलेक्ट्रॉनिक पेआऊट द्वारे तुमच्या डीमॅट खात्याला जोडलेल्या बँक खात्यात रिडम्शनची रक्कम जमा केली जाईल.
शेवटी, गुंतवणूकदारांनी विशिष्ट कालावधीपूर्वी म्युच्युअल फंडचे रिडम्शन करताना लागू शकणाऱ्या एक्झिट लोड्स सारख्या शुल्काबद्दल माहिती घ्यावी. फंडाचा प्रकार आणि कालावधीनुसार एक्झिट लोड बदलतात. ELSS सारख्या काही योजनांमध्ये लॉक-इन कालावधी नक्की केलेला असतो ज्यापूर्वी त्या रिडीम केल्या जाऊ शकत नाहीत. तसेच कॅपिटल गेन टॅक्समुळे, जो गुंतवणुकीची रक्कम आणि कालावधी यावर अवलंबून असतो, परताव्यावर मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो. म्युच्युअल फंडचे रिडम्शन करण्यापूर्वी गुंतवणूकदाराने एक्झिट लोड आणि टॅक्स याविषयी माहिती घेऊन रिडम्शनचा निर्णय घ्यावा.
अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.