कर-लाभ देणारे म्युच्युअल फंड किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम असे डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड असतात जे आपल्याला मिळकत कर कायद्याच्या कलम 80C प्रमाणे कर-लाभ देतात. त्यामुळे, ELSS फंड अशा करदात्यांसाठी योग्य आहेत जे कर-बचत करण्यासाठी इक्विटी-ओरिएंटेड साधनांचा वापर करण्याची जोखीम पत्करण्यास तयार आहेत. ELSS फंड पगारदार वर्गासाठी अधिक योग्य आहेत कारण अशा लोकांकडे मिळकतीचा एक नियमित स्रोत असतो आणि त्यांना दर वर्षी कर-बचत करावी लागते. खरे तर, असे लोक दर महिन्याला SIP च्या माध्यमाने ELSS मध्ये सोप्या रीतिने गुंतवणूक करू शकतात ज्याने त्यांना रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंगचा फायदा मिळतो.
जर आपण तरुण करदाते असलात, तर आपण ELSS मध्ये गुंतवणूक करण्याचा दुहेरी फायदे घेऊ शकता, म्हणजेच ELSS मध्ये गुतंवणूक करून कलम 80C अन्वये कर-लाभ घ्या आणि दीर्घकाळामध्ये इक्विटीच्या वाढीच्या शक्यतेचा फायदासुद्धा घ्या. वयस्कर करदाते सुद्धा ELSS मध्ये गुंतवणूक करून कर-लाभ घेऊ शकतात, तरीही ELSS मध्ये इक्विटीची जोखीम असल्यामुळे
अधिक वाचा