कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करण्याआधी आपल्याला केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी स्वतःच्या ओळखीचा पुरावा आणि घराच्या पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. एसआयपी सुरू करणे किंवा बंद करणे ह्याची प्रक्रिया अगदी सोपे असते. डावीकडील ग्राफिक्समध्ये एसआयपी कशी सुरू करावी ते सांगितले आहे.
जर आपले एक-दोन हप्ते चुकले तर काय होईल?
एसआयपी हा फक्त गुंतवणुकीचा एक सोपा मार्ग आहे आणि यात कोणतीही करारात्मक बंधन नाहीत, त्यामुळे जर आपले काही हप्ते चुकले तरीही कोणताही दंड भरावा लागत नाही. जास्तीत जास्त असे होईल की म्युच्युअल फंड कंपनी आपले एसआयपी थांबवील, म्हणजे आपल्या बँक खात्यामधून पुढील हप्ते वजा होणे बंद होईल. तसेच, आधीचे एसआयपी थांबवले गेले असले तरीही.आपण एकाच फोलिओमध्ये, दुसरे एसआयपी सुद्धा सुरू करू शकता. कृपया लक्षात ठेवा की याला नवीन एसआयपी म्हटले जाते आणि त्यामुळे नव्याने एसआयपी सुरु होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.
आजच एखाद्या तवणूक सल्लागार चर्चा करा आणि म्युच्युअल फंड्सच्या फायद्यांचा आनंद लूटा!