वरील प्रश्नाचे सर्वात योग्य उत्तर काय असू शकेल ते आपण समजून घेऊया.
गुंतवणूकदारांबरोबर साधल्या गेलेल्या अनेक चर्चांनंतर, आम्हाला असे वाटते की, बरेचदा गुंतवणूकदाराला जेवढ्या काळासाठी गुंतवणूक करायची आहे त्या काळात त्याला सर्वोत्तम परतावे देणारी स्किम शोधणे ही त्याची दडवलेली, व्यक्त न केलेली गरज असते .
प्रत्यक्षात, गुंतवणूकदारासाठीही तो किती काळ गुंतवणूक करणार आहे ह्याचा अंदाज घेणे अत्यंत अवघड असते. बाजाराचा अंदाज आणि कोणती स्किम आणि व्यवस्थापक ठराविक कालावधीत सर्वाधिक भांडवली फायदा मिळवून देऊ शकेल की नाही हे जाणून घेणे त्याहूनही अशक्य असते.
एका परिस्थितीत जे चांगले आहे ते दुसर्या परिस्थितीत कदाचित चांगले असेलच असे नाही. उदाहरणार्थ, आपले हिवाळी कपडे उन्हाळ्यात वापरण्यासाठी योग्य नसतात. त्याचप्रमाणे, मुलाच्या वाढीसाठी चांगले असलेले केळे, मधुमेह असलेल्या वडीलांसाठी कदाचित अपायकारक ठरु शकते.
भविष्याचा योग्य अंदाज वर्तवू न शकलेले अनेक तज्ञ होऊन गेल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. म्हणूनच, कोणाही व्यक्तीने मागील कामगिरीमुळे डगमगून न जाता, आपल्या सध्याच्या विशिष्ट परिस्थितीनुसार आणि भविष्यातील गरजांनुसार योग्य अशी स्किम निवडणे अधिक चांगले आहे.