आपण म्युच्युअल फंडबद्दल माहिती काढताना, त्यांची कामगिरी, एनएव्ही आणि रँक पहाताना RST ब्ल्यूचिप फंड किंवा XYZ लार्ज कॅप फंड अशी नावे ऐकली असतील. फंडच्या नावात ‘ब्ल्यूचिप फंड’ आणि ‘लार्ज कॅप फंड’ हे शब्द समान अर्थाने वापरले जातात कारण हे दोन्ही असे इक्विटी म्युच्युअल फंड दर्शवतात जे स्टॉक एक्सचेंजवरील लार्ज कॅप कंपनींच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात.
जर आपण ऑक्टोबर 2017 मध्ये जारी केलेले आणि जून 2018 पासून लागू झालेले सेबीचे प्रॉडक्ट कॅटेगरायझेशन सर्क्युलर पाहिलेत, तर त्यात इक्विटी फंडच्या प्रकारांमध्ये ब्ल्यू चिप फंड हे नाव कुठेच दिसत नाही. याचा अर्थ असा होतो का, की आता आपल्यासाठी ब्ल्यू चिप फंड उपलब्ध नाहीत? नाही, याचा अर्थ फक्त एवढाच आहे की नाव काहीही असू देत, जर एखादा फंड मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे टॉप 100 कंपनींच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असेल, तर तो आता लार्ज-कॅप म्युच्युअल फंड या प्रकारात
अधिक वाचा