एसआयपी विरुद्ध एसटीपी - फरक जाणून घ्या

एसआयपी विरुद्ध एसटीपी - फरक जाणून घ्या

सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी) किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) या अर्थाने समान आहेत की ते ठराविक कालांतराने नियमित गुंतवणूक करण्यास मदत करतात. मात्र, त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आपण हे दोन्ही स्वतंत्रपणे आणि एसआयपी आणि एसटीपीमधील फरक समजून घेऊ शकतो.

1. एसआयपी: एसआयपी हा म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. यात गुंतवणूकदार नियमित अंतराने जसे दैनंदिन, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक आणि इतर प्रकारे कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेत ठराविक रक्कम गुंतवू शकतो. म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचा हा पद्धतशीर आणि शिस्तबद्ध प्रकार आहे.

2. एसटीपी: एसटीपीमध्ये गुंतवणूकदार एका म्युच्युअल फंड योजनेतून त्याच फंड हाऊसच्या दुसऱ्या म्युच्युअल फंड योजनेत पैसे हस्तांतरित करू शकतो. एसटीपीद्वारे तुम्ही पूर्वनिर्धारित कालांतराने एका म्युच्युअल फंड योजनेतून दुसऱ्या म्युच्युअल फंड योजनेत हस्तांतरित केली जाण्याची एक ठराविक रक्कम ठरवता. ही पध्दत अशा गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे ज्यांना एकरकमी गुंतवणूक करायची असते परंतु अस्थिरता कमी करण्यासाठी गुंतवणूकीची सुनियोजितपणे आखणी करायची असते. 

हे दोन्ही गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण प्रकारचे आहेत म्हणून, आपण एसआयपी विरुद्ध एसटीपी म्हणजे काय आणि ते कसे कार्य करतात हे काही सोप्या उदाहरणांसह हे समजून घेऊ शकतो. 

एसआयपी उदा:

ज्या गुंतवणूकदाराला एसआयपीच्या स्वरूपात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे, त्याला प्रथम योग्य म्युच्युअल फंड निवडावा लागेल, गुंतवणुकीची वारंवारता निवडावी लागेल (उदा. दर महिन्याला), त्याला गुंतवणूक करायची रक्कम निवडावी लागेल (समजा/उदा. 10,000 रुपये), योजना आणि त्यांच्या बँक खात्यातून निवडलेल्या फंडात आपोआप डेबिट होणे सेट करावे लागेल. यामुळे एसआयपीच्या माध्यमातून निवडलेल्या म्युच्युअल फंड योजनेत 10,000 रुपयांची गुंतवणूक करता येते.

एसटीपी उदा: 

एका गुंतवणूकदाराकडे एकरकमी 20 लाख रुपयांचा निधी आहे, पण बाजार अस्थिर असल्याने गुंतवणूकदार इक्विटी फंडात एकरकमी गुंतवणूक करू इच्छित नाही. त्यामुळे तो/ती संपूर्ण वीस लाख रुपये शॉर्ट टर्म डेट फंडात गुंतवतो/ते, जे तुलनेने कमी अस्थिर असतात. मग, तो/ती त्या फंडासाठी एसटीपी सेट करू शकतो/ते, ज्यात तिच्या डेट फंडातील पैसे नियमित कालांतराने निवडलेल्या इक्विटी फंडांमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात. 

एसटीपी एकाच फंड हाऊसमधील म्युच्युअल फंड योजनांसह सेट केले जाऊ शकतात. गुंतवणूकदार एका फंड हाऊसमध्ये दोन किंवा अधिक योजनांसह एसटीपी सेट करण्याचा पर्याय निवडू शकतो. गुंतवणुकदाराने ज्या डेट फंडात एकरकमी गुंतवणूक केली आहे, त्या फंडासाठी एक्झिट लोड आहे का हे पाहिले पाहिजे.
 
अस्वीकरण

 म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.
 

282

म्युच्युअल फंड सही आहे?