एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) अनेक बाबतीत सामान्य म्युच्युअल फंड्स पेक्षा अधिक चांगले आहेत. ज्यांना म्युच्युअल फंड मध्ये पैसे गमावण्याची काळजी वाटते अशा पहिल्यांदा इक्विटी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हे उत्तम साधन आहे. याचे कारण काय?
• ईटीएफ एका लोकप्रिय इंडेक्सचे अनुकरण करतात, त्या इंडेक्स मधील सर्व सिक्युरिटीज त्यांत असतात आणि त्यांत म्युच्युअल फंडपेक्षा अधिक वैविध्य असते.
• अनुकरण करण्याच्या या नीति मुळे (अक्रिय फंड व्यवस्थापन) सक्रिय व्यवस्थापन केलेले फंड, जे त्यांच्या मापदंडापेक्षा अधिक परतावा दाखवण्यासाठी आपल्या पोर्टफोलिओ मधील सिक्युरिटीज अनेक वेळा खरेदी किंवा विक्री करतात त्यांच्यापेक्षा यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी होतात. सक्रिय व्यवस्थापन केलेल्या फंडमधील या व्यवहारांमुळे अधिक कर आकारणी होते कारण फंडला त्यांच्या पोर्टफोलिओ मधील सिक्युरिटीज विकताना किंवा खरेदी करताना एसटीटी (सिक्युरिटीज ट्रांझॅक्शन टॅक्स) आणि कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे इतर म्युच्युअल फंडपेक्षा ईटीएफ करांच्या बाबतीत अधिक कार्यकुशल
अधिक वाचा